निगुडे रस्त्याची उप अभियंत्यांनी केली पाहणी | सरपंचांना दुरुस्तीची दिली ग्वाही

Edited by: भगवान शेलटे
Published on: July 26, 2023 15:58 PM
views 220  views

बांदा : शेर्ले - निगुडे सोनुर्ली मुख्य रस्ता पहिल्या पावसातच खराब झाला होता. रस्त्याच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल कोकणसाद LIVE मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. याचीच दखल घेत उप अभियंता वैभव सगरे, कंत्राटदार परांजपे, निगुडे सरपंच, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शाखाप्रमुख वैभव आरोसकर यांनी रस्त्याची पाहणी केली.   

सदर रस्ता पुर्ण होऊन महिनाही न होता पहिल्याच पावसात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील मो-या खचल्या असून ब-याच ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाल्याने सरपंच निगुडे लक्ष्मण निगुडकर यांनी १० जुलैला उप अभियंता सा. बा. सावंतवाडी तसेच कार्यकारी अभियंता सा. बा. सावंतवाडी यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले होते.

कोकणसाद LIVE ची बातमी आणि सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या पत्राची दखल घेऊन संबधित विभागाने या  रस्त्याची पाहणी केली आणि तात्पुरत्या दुरुस्तीची ग्वाही दिली.