
कणकवली : रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण, इंग्रजी हस्ताक्षर, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशा विविध गटात घेतली गेलेली ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मुलुंड मुंबईच्या संस्थेने आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
सदर स्पर्धा रंगभरण व इंग्लिश हस्ताक्षर या दोन गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण २९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी रिद्धी तांबे, खुशी बागवे, वेदांत घाडीगावकर, यश बिर्जे, अस्मि मेस्त्री, सलोनी घाडीगावकर, सुदर्शन बिर्जे यांना गोल्ड मेडल तर पार्थ घाडीगावकर, ऋतुजा घाडीगावकर, सुहानी घाडीगावकर या विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त झाले आहे. इतर सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. उपक्रमशिल पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा तावडे यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली.
माईण शाळेतील शिक्षक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका दीपा काकतकर, पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा तावडे, राधिका सावंत, सहकारी शिक्षिका योगिता माळी, ऋजुता चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. मुलांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक - शिक्षक संघ, माता - पालक संघ व ग्रामस्थ माईण यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.