
सावंतवाडी : राष्ट्रीय रायफल शूटिंग असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्य यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात खजिनदार या महत्वपूर्ण पदावर सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड. मेघश्याम उर्फ विक्रम भांगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री.भांगले यांनी भारतीय संघांचे प्रशिक्षक,संघ व्यवस्थापक तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जुरी तथा आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी करून सावंतवाडीचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल उपरकर शूटिंग अकॅडमी व सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ऍड.भांगले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूं आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्या साठी कार्यरत राहण्याची हमी दिली.










