![](https://kokansadlive.com/uploads/article/17253_pic_20250215.1145.jpg)
देवगड : देवगड तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल यांची नियुक्ती झाल्यामुळे नवनिर्वाचित शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल यांचा देवगड तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना -पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवागड तालुकाप्रमुखपदी रवींद्र जोगल (कार्यक्षेत्र- शिरगाव, किंजवडे,. मिठबाव, देवगड शहर) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.अशी माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आल्याचे समजताच उबाथा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून देवगड तालुका शिवसेना उबाठा कडून त्यांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर,माजी सभापती अमित साळगावकर,शिरगाव विभाग प्रमुख मंगेश फाटक,विक्रांत नाईक,प्रतीक्षा साटम,रेश्मा सावंत ,अशोक जाधव ,सुधाकर साटम ,महेश परब, बापू सावंत ,सुधीर जाधव सूर्यकांत फाटक, बापू फाटक चंद्रकांत खरात ,सागर चौकेकर, राजेंद्र चव्हाण, दत्ताराम, अभिषेक कदम, मंगेश धोपटे, शरद फाटक, लोके सर , हिंदळेकर , वैभव धोपटे ,रामचंद्र माने, राजेंद्र तावडे ,गौरव सावंत, आदी उबाठा शिवसेना कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.