
दोडामार्ग : सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा दोडामार्ग नूतन कार्यकारिणी रविवार दिनांक ७ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत दोडामार्ग शाखेचे सल्लागार रमाकांत जाधव यांच्या मार्गदर्शना खाली व केंद्रीय शंकर झिलू जाधव (उसपकर) यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी शंकर मधुकर जाधव, उपाध्यक्षपदी अर्जुन कृष्णा आयनोडकर तर सचिव पदी संदीप आनंद जाधव यांची निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई केंद्रीय कार्यकारणीचे अध्यक्ष व्ही. ए. कदम यांच्या सूचनेनुसार दोडामार्ग तालुका शाखा नूतन कार्यकारिणी निवड करण्यासंदर्भात रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष तथा माजी तालुका अध्यक्ष शंकर झिलू जाधव (उसपकर) यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उसप येथील निवासस्थानी पार पडली. तथागत भगवान गौतम बुध्द प.पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठक सुरु करण्यात आली. दोडामार्ग शाखेचे सल्लागार रमाकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारिणी सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्वप्रथम बैठकीचे प्रास्ताविक संदीप जाधव यांनी केले.
यावेळी शंकर झिलू जाधव (उसपकर), रमाकांत जाधव, शंकर मधुकर जाधव, अर्जुन कृष्णा आयनोडकर, प्रकाश लक्ष्मण कांबळे, संदीप आनंद जाधव, वेंगुर्ला शाखेचे वाय. जी. कदम, उपाध्यक्ष बी.जी.जाधव, सरचिटणीस जे. आर. जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठल अ. जाधव, सहसचिव अमोल गणपत जाधव उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे* तालुकाध्यक्ष - शंकर मधुकर जाधव, तालुकाउपाध्यक्ष - अर्जुन कृष्णा आयनोडकर, सरचिटणीस - संदीप आनंद जाधव, खजिनदार - प्रकाश लक्ष्मण कांबळे, हिशोब तपासनीस - शंकर झीलू जाधव (उसपकर), सल्लागार - रमाकांत कृष्णा जाधव
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, तालुका शाखा, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आणि गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडीला आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. दोडामार्ग तालुक्यात महासंघाची व्यापक बांधणी करण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढवून संघ मजबूत करणे त्याचबरोबर इतर विषयावर चर्चा करण्यात आली.
नवनीर्वाचित तालुका अध्यक्ष शंकर मधुकर जाधव, सल्लगार रमाकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. वेंगुर्ला शाखेचे पदाधिकारी यांनी नूतन कार्यकारिणीचे पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
दोडामार्ग तालुका शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा विस्तार करण्या संदर्भात शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता स्नेह रेसिडेन्सी हॉटेल दोडामार्ग याठीकाणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जास्तीत जास्त बौद्ध बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन नवनीर्वाचित नूतन कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी केले आहे.










