न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडाचे सुवर्ण यश !

वेताळ प्रतिष्ठानच्या विविध स्पर्धेत मारली बाजी
Edited by: दीपेश परब
Published on: January 11, 2023 22:24 PM
views 136  views

वेंगुर्ले : सामाजिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानचा अश्वमेध महोत्सव नुकताच संपन्न झाला.

रस्सीखेच स्पर्धेत भाग घेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यचा वापर करत विजयाचा शुभारंभ केला. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संदेश खानोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

त्यानंतर याच मंडळाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथमेश भोकरे या विद्यार्थ्यांने यश मिळवले.

यानंतर संपन्न झालेल्या निंबध स्पर्धेत नववी इयत्तेतील विद्यार्थिनी गायत्री वरगावकर प्रथम तर श्रुती शेवडे तृतीय क्रमांक मिळवत विजयश्री प्राप्त केली.

तसेच वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात कृपा म्हाडदळकर आणि श्रुती शेवडे यांनी विजयी घोडदौड कायम राखली. त्यानंतर संपन्न झालेल्या रांगोळी स्पर्धेत याच प्रशालेची किंजल नार्वेकर द्वितीय तर प्रतिक तांडेल या दहावीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

वेताळ प्रतिष्ठानने घेतलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतही न्यू इंग्लिश स्कूलने आपल्या विजयाची परपंरा राखत  दशावतार अभिनय स्पर्धेत वीर गावडे यांने प्रथम क्रमांक मिळवला. त्याला लौकिक प्राप्त लोककलावंत पप्पु नादोसकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर समुहनृत्य स्पर्धेतही याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यासाठी शरयू गोसावी आणि गायत्री चेंदवणकर यांनी मार्गदर्शन केले.

तर समुहगान स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्यांना याच विद्यालयाचे माजी अध्यापक कुबल सर यांनी मार्गदर्शन केले. तर तबला साथ आकाश नाईक याने केली.

जोडीनृत्य स्पर्धेत श्रुती शेवडे आणि योजना कुर्ले यांनी विजेतेपद पटकावले आणि प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथमेश भोकरे आणि आनंद कारेकर यांनी बाजी मारत या यशावर विजयी कळस चढवला. वेताळ प्रतिष्ठानने घेतलेल्या जवळपास सगळ्याच स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जवळपास दीड डझनपेक्षा जास्त चषक आपल्या खिशात घालत प्रतिष्ठेचा मानला जाणारा वेताळ करडंकावरही आपले नाव  कोरले.

विविध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेने मिळवलेल्या यशाचे  कौतुक मुख्याध्यापक वाळवेकर यांनी केले.

तसेच हे यश संपादन करणारे सर्व विद्यार्थी, त्यांचे सर्व मार्गदर्शक, शिक्षक, त्यांना साथ  देणारे  शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचे संस्थाध्यक्ष विंरेद्र कामत आडारकर तसेच सचिव सुप्रसिद्ध रांगोळीकार रमेश नरसुले, माजी गटशिक्षण अधिकारी या संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर आदी सर्व पदाधिकारी यांनी या दैदिप्यमान यशासाठी कौतुक केले. या यशाबद्दल सर्व स्तरातून या विद्यालयाचे कौतुक होत आहे.