
सिंधुदुर्ग : धामापूर शिवसेना शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक, आणि शिवसेना महिला उपविभाग प्रमुख पदी जागृती भोळे यांची नेमणूक करण्यात आली असून खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना सचिव, खा.विनायक राऊत, शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज धामापूर गावभेट दौरा केला. यावेळी हि निवड करण्यात आली.दरम्यान गावातील विकास कामांचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महाभोज, कमलाकर गावडे, कट्टा ग्रा.प सदस्य बाबू टेंबुलकर, अण्णा गुराम,महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, तळगाव सरपंच लता खोत आदींसह धामापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.