नेवलीचे ग्रामदैवत माऊलीचा जत्रोत्सव रविवारी !

Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 19:05 PM
views 98  views

सावंतवाडी : सरमळेनजीक नेवली गावचे ग्रामदैवत येथील श्री देवी माऊली मंदिरात शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी हरिनाम सप्ताह तर माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी १० डिसेंबर रोजी होत आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या माऊलीच्या या वार्षिक उत्सवात हजारो भाविक नतमस्तक होतात. 

        

शुक्रवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी सात प्रहाराच्या हरीनाम सप्ताहाला विधिवत प्रारंभ झाल्यानंतर नेवली परिसरातील भजन मंडळे आपली सेवा माऊली चरणी अर्पण करणार आहेत. या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी महाप्रसादाच्या  कार्यक्रमाने होणार आहे.रविवारी १० डिसेंबर रोजी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकी नंतर जय हनुमान दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या सर्व मानकऱ्यांनी आणि नेवली ग्रामस्थानी केले आहे.