'नेट-जेआरएफ' परीक्षा प्रा. सौ. हेमश्री चिटणीस उत्तीर्ण

ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी सुध्दा पात्र
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 10, 2022 18:56 PM
views 290  views

सावंतवाडी : युजीसी मार्फत राष्ट्रीय स्तरावरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी 'नेट-जेआरएफ' ही परीक्षा सावंतवाडीच्या स्नुषा प्रा. सौ. हेमश्री किशोर चिटणीस या मराठी विषयातून उत्तीर्ण झाल्या असून, त्यासोबत त्या ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी सुध्दा पात्र ठरल्या आहेत. प्रा.सौ. चिटणीस या सध्या देवगड येथील श्री. स.ह.केळकर महाविद्यालयात मराठी विषयाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्या मालवण येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.सुवर्णलता काशिनाथ मांजरेकर आणि सांडवे हायस्कूल मधील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक काशिनाथ मांजरेकर यांच्या कन्या असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी कर्मचारी महेश चिटणीस व सौ.मनीषा चिटणीस यांच्या स्नुषा आहेत. यापुर्वी त्या एप्रिल २०२१ मध्ये मराठी विषयातूनच 'सेट'ही परीक्षा उत्तीर्ण असल्यामुळे या दुहेरी यशाबद्दल प्रा. सौ.हेमश्री चिटणीस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.