BIG BREAKING | नानेलीसह हळदीचे नेरुर इथं आज जुगाराचा पट रंगणार ?

आता तरी स्थानिक पोलीस कारवाई करणार का ?
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 02, 2023 19:14 PM
views 753  views

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील नानेली आणि हळदीचे नेरूर इथ आज असलेल्या वार्षिक जत्रोत्सवात जुगाराचा पट रंगणार अशी माहिती गोपनीय खबऱ्याकडून मिळाली आहे. सध्या माणगाव खोऱ्यातील गावा-गावात वार्षिक जत्रोत्सवाचा   उत्साह संचारला आहे. मात्र, या धार्मिक उत्साहाला गालबोट लावण्याचं काम काही जुगारवाले करत आहेत. पोलिस यंत्रणेला चकवा देत या जत्रोत्सवात जुगाराचे पट भरत आहेत. आज तर नाणेली आणि हळदीचे नेरूर इथ असलेल्या वार्षिक जत्रोत्सवात जुगार पट भरणार अशी माहिती गोपनीय खबऱ्याकडून मिळाली आहे. तरी जुगार पटावर स्थानिक पोलीस कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.