
सावंतवाडी : नेमळे येथील श्री देव कलेश्वर मलेश्वर देवस्थान प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार १० फेब्रुवारी २०२५ या कालावधी मध्ये संपन्न होत आहे. या निमित्ताने श्री मलेश्वर मंदिरामध्ये शिव शक्ती याग सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास सर्व देणगीदार शिमधडे भाविक भक्त पाहुणे मंडळीनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपाप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रमुख गावकर मंडळी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कार्यक्रमात शनिवार दि. ८ फेब्रुवारी - सकाळी ७ ते ९ - शांतिपाठ, देवतांची प्रार्थना, पुण्याहवाचन, संभारदान सकाळी - ९ ते १० सिद्धी विनायक महागणपती पूजन, प्रकार शुद्धी देवता स्थपना, रुद्रा भिषेक, अग्नी स्थापना, ग्रहत्याग, रविवार -9 फेब्रुवारी - सकाळी -7 ते 11 -आवहीत देवतांचे पूजन,होमहवन,बालिप्रदान,पूर्णाहुती आरती,तीर्थ प्रसाद, महाप्रसाद, सोमवार दि 10 फेब्रुवारी -सकाळी -11 वा -श्री देवी सातेरी मंदिरात लघुरुद्र, व ब्राम्हण समराधना, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद.तसेच रात्रौ ठीक -10 वा -जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.