
सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून, परीक्षेला १७ विद्यार्थी बसले होते १७ उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम : कु. सोनू सखाराम मुळीक (77%), द्वितीय - कु. संजना संतोष तुळसकर ( 65.67%), तृतीय : कु. मंगेश एकनाथ मुळीक (63.67%) यांनी प्राप्त केला.
तर कला शाखेचा निकाल 85.71% लागला. प्रथम कु. सिद्धेश रामकृष्ण गावडे (65.17%), द्वितीय कु. जददी सारीया लियाकत (57.50%), तृतीय कु. तन्वी श्रीधर हरमलकर (53%) लागला. वाणिज्य शाखेचा सलग दहा वर्ष शंभर टक्के निकाल लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ मुख्यकार्यकारी अधिकारी र.वि.तेंडोलकर मुख्याध्यपक क. वि. बोवलेकर तसेच शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.