
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाने पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेमध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.
या परीक्षेत पाचवीतून पंधरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. वैभवी पांडुरंग पाटकर 100 पैकी 98 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय रुंजी राजन कोकरे 78 गुण तृतीय वैष्णवी मिलिंद आंबेरकर 76 गुण प्राप्त केले .
इयत्ता आठवीमधून 46 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. शंभर टक्के निकाल लागला. लौकिक घनश्याम आळवे व वेदिका जयंत वजराटकर यांनी 100 पैकी 98 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्नेहा पांडुरंग परब व पूर्वा नरेश परब यांनी 96 गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला. यश सचिन गावडे, पल्लवी रामचंद्र गोवेकर वेदांत विकास पालयेकर यांनी प्रत्येकी 92 गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला या यश प्राप्त विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक नितीन धामापुरकर व मयेकर यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ सर व प्राचार्या सौ कल्पना बोवलेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.