राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2026 15:15 PM
views 15  views

सावंतवाडी : सम्यक मित्र मंडळ, बांदा आयोजित 135 व्या आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्गचा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक अरुण सुतार यांनी केले.

नीलला बांदा गावचे उपसरपंच आणि चार्टर अकाउंट रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी नीलला त्याची आई सौ. गौरी बांदेकर आणि वडील नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. आतापर्यंत वक्तृत्व कथाकथन, वेशभूषा, गीत गायन,चित्रकला, मॉडेलिंग, हस्ताक्षर यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नीलने 500 हून अधिक बक्षिसे पटकावली आहेत. विविध स्तरावरून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे