
सावंतवाडी : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय दिन सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत सावंतवाडीच्या नीता सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
द्वितीय क्रमांक सानिका वायंगणकर (मालवण) राजन जाधव (वेंगुर्ला) तर तृतीय क्रमांक संजय तांबे (कणकवली) अथर्व कोचरेकर (कणकवली) यांना विभागून देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण १५ निबंध प्राप्त झाले होते. स्पर्धेचे परीक्षण डीएड कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांनी केले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २ जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे संपन्न होणार आहे. तरी विजेत्या सर्व स्पर्धकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी केले आहे.