
बांदा : छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त बांदा येथे आयोजित केलेल्या श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे .
त्याचबरोबर डॉट कॉम असोसिएशन आयोजित ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत तो संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा विजेता ठरला. तसेच ऑफलाइन स्पर्धा परीक्षेत सहाव्या क्रमांका मध्ये येऊन त्याने मेरिट लिस्ट मध्ये स्थान प्राप्त केले आहे. अभ्यासाबरोबरच इतर कलेमध्येही नीलने आपली चमक दाखवून दिली आहे .
त्याच्या या यशात केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापक त्याचबरोबर शाळा समिती यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे










