दोडामार्गमधील गरीब मुलीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी तातडीच्या मदतीची आवश्यकता

गरज छोट्याश्या मदतीची
Edited by:
Published on: February 24, 2025 17:31 PM
views 370  views

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी - खालची वाडी येथील १३ वर्षे वय असलेल्या कु. वंशिका विष्णु सावंत हिचे आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तातडीने यकृत प्रत्यारोपणाची Liver Transplant गरज निर्माण झाली आहे. सध्या ती गोवा येथील बांभूळी येथील रुग्णालयात असून यकृत प्रत्यारोपण तसेच पुढील उपचारासाठी बंगलोर किंवा मुंबई येथे हलवावे लागणार आहे.

पुढील उपचार अत्यंत खर्चिक असून घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. तिचे आई वडील शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. हाती असलेली काहीशी बचत आणि नातेवाईकांनी केलेली मदत आतापर्यंतच्या उपचारासाठी खर्ची झाली असून पुढील उपचारासाठी पैसे कसे उभे करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी मुलीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत करावी असे आवाहन केले आहे.

मदत करण्यासाठी Gpay नंबर - 7588862507 (उदय कोठावळे, मुलीचा मामा)

संपर्क - 7588209887 (आरती विष्णु सावंत, मुलीची आई)

[spacer height="20px"]

रुग्णालयाचे अहवाल आणि इतर कागदपत्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://drive.google.com/file/d/1Sg0QOusEVnGz8SSQxJwSgol09lD7OyQG/view?usp=sharing


https://drive.google.com/file/d/1pAbeV4K1ReUEASzQNJM9eQwTxkU0brgE/view?usp=sharing