आरक्षणाची आरपारची लढाई जिंकणे काळाची गरज : सीताराम गावडे

Edited by: विनायक गावस
Published on: November 02, 2023 12:24 PM
views 83  views

सावंतवाडी : मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज कुणकेरी ग्रामस्थांच्यावतीने भावई मंदिरामध्ये बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी ही आरक्षणाची आरपारची लढाई आहे. प्रत्येक मराठा समाजाने ही आपल्या घरातील लढाई आहे असे समजून झोकून देऊन मराठा समाजाला संघटित करायला पाहिजे व सनदशीर मार्गाने लढा उभारून शासनाला हलवले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी राजकीय मतभेद विसरून सर्व मराठा समाजाने एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. मराठा जातीसाठी सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवा व मराठा जात म्हणून एकत्र या असे आवाहन यावेळी बोलताना केले.यावेळी गावचे जेष्ठ नागरिक मंगेश सावंत, उपसरपंच सुनील परब, गुरु परब,मनोज घाटकर यांनी मते मांडली.

गावच्या वतीने शुक्रवारी लाक्षणीक उपोषण छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी तानाजी सावंत,भिवाजी परब,कैलास परब रघुनाथ गावडे रवींद्र सावंत प्रदीप सावंत दिनेश परब साहिल सावंत लक्ष्मण सावंत चंद्रकांत सावंत यशवंत परब सुरज देवणे प्रसाद सावंत मंगेश परब सागर परब सौरभ परब राजाराम धुरी विश्राम सावंत आत्मे सावंत प्रवीण परब दत्तप्रसाद परब जयेश सावंत अरुण गावडे कृष्णा सावंत नारायण सावंत नरेश परब एकनाथ सावंत सचिन गावडे महादेव गावडे बाबली सावंत मकरंद सावंत सखाराम सावंत रामचंद्र परब किरण सावंत सहदेव गावडे निळकंठ परब राजेंद्र परब प्रदीप परब गंगाराम गावडे रवींद्र सावंत मंगेश सावंत केतन सावंत शंकर परब आदि उपस्थित होते.