पुरस्थितीत बचाव कार्य कसं कराल ? ; NDRF कडून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 14, 2024 14:57 PM
views 174  views

कुडाळ : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत व तहसीलदार कार्यालय मालवण यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( NDRF ) यांच्यावतीने शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी काळसे  येथे कर्ली नदीकिनारी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना पुर आणि वादळ अशी आपत्ती आल्यानंतर बचाव कार्य कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले. 

"आपला जिल्हा पुरप्रवण असल्याने आपत्ती आल्यानंतर सर्व यंत्रणांनी तत्पर असणे गरजेचे असते त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (  NDRF ) मार्फत चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून संबंधित यंत्रणा यामध्ये महसूल विभाग,  ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग,  पोलीस विभाग,  मत्स्य व्यवसाय विभाग,  बांधकाम विभाग, बंदर विभाग,  नगरपालिका अग्निशमन विभाग. या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले"  अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी यावेळी दिली.  तत्पूर्वी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल निरीक्षक  पंकज चौधरी यांनी उपस्थित सर्व यंत्रणांच्या व विभागांच्या प्रतिनिधींना येणारी आपत्ती टाळता येत नाही परंतु त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. असे सांगत एखादी आपत्ती आल्यानंतर सर्व यंत्रणांना त्यांची जबाबदारी समजावून सांगितली, आणि आपत्ती काळात बचाव कार्य  कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. 

 यानंतर वादळ आणि पूरस्थितीची प्रतिकात्मक परिस्थिती उद्भवल्याचा प्रसंग निर्माण करून एनडीआरएफच्या 28 जवानांनी कर्ली नदीमध्ये निरीक्षक पंकज चौधरी आणि राजू प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पुरात अडकलेल्या पूरबधितांना कशा प्रकारे बचाव कार्य करून वाचवता येते हे प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवले या प्रात्यक्षिकामध्ये आरोग्य विभागासह इतर यंत्रणांच्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदवला. 

या प्रशिक्षण मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निरीक्षक पंकज चौधरी, राजीव प्रसाद, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, मालवण नायब तहसीलदार प्रिया परब हर्णे, मालवण पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, कट्टा पोलीस दुरुक्षेत्राचे प्रकाश मोरे, पोलीस पाटील विनायक प्रभू, बंदर विभाग मालवणचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, सहाय्यक बंद निरीक्षक अनंत गोसावी, आंबेरी मंडळ अधिकारी डी. व्ही.  शिंग्रे, विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी तलाठी नीलम सावंत, आंबेरी तलाठी श्री.  थोरात, समुदाय आरोग्य अधिकारी आदेश माताडे, आरोग्य सहायिका शिला सरमळकर, आरोग्य सहाय्यक एस. एस. चव्हाण, आरोग्य सेविका गौरी कसालकर आरोग्य सेवक एस. डी. वेंगुर्लेकर, रुग्णवाहिका चालक शशांक चव्हाण, कनिष्ठ अभियंता जि. प. उपविभाग मालवण नितीन पोवार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रमेश पवार, सा. बां. विभाग मालवणचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक समाधान खैरनार, मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्गचे सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, ग्रामसेवक पी. आर. निकम, कोतवाल प्रसाद चव्हाण, श्रीधर गोसावी,  ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश काळसेकर, श्रीकृष्ण भाटकर, ग्रामस्थ सयाजी सकपाळ, आधी जण सहभागी झाले होते.