
सिंधुदुर्गनगरी : रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे ओरोस ख्रिश्चन वाडी येथे पुन्हा पाणी भरू लागले आहे. घरांमध्ये पाणी येत असल्याने नागरिक ही आधीच जागृत झाले आहेत. तर प्रशासनही या ठिकाणी आधीच उपस्थित झाले आहे. एनडीआरएफची टीम ही दाखल झाली होती. तर कुडाळ प्रांत, तहसीलदार आदींसह जिल्हा प्रशासन तात्काळ या ठिकाणी हजर झाले आहे. ज्या लोकांची घरे पाण्यात जाण्याची शक्यता आहे. अशांना बाहेर काढून सुखरूप ठिकाणी नेण्यात येत आहे.