राष्ट्रवादीचं 'ते' आंदोलन थांबविण्याची विनंती

Edited by: विनायक गावस
Published on: December 05, 2023 13:30 PM
views 125  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन करण्यात येऊ नये अशी विनंती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांकडून तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं केलेल्या मागण्यांच्या पुर्ततेसह इतरबाबींची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी पत्राद्वारे दिली आहे. ‌

यात अपघात विभागात दाखल होणा-या रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन संबंधित विशेषज्ञ यांना कॉल देऊन बोलवण्यात येते व उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवुन त्यांना आर्थिक झळ बसणार नाही याची दक्षता घेणेत येत आहे. बालरोगतज्ञ, सोनोग्राफीकरीता स्त्रीरोगतज्ञ यांना रविवार इ. सुट्टीच्या दिवशीही ऑन कॉल राहणेबाबत व तातडीच्या प्रसंगी उपस्थित राहुन सेवा पुरविणेचे आदेश देण्यात आलेले असल्याच सांगितलं.