आमचा पक्ष 'शरद पवार' !

दगाबाजांना जनता धडा शिकवेल : अमित सामंत
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 09:57 AM
views 172  views

▪️निवडणूक आयोग अदृश्य शक्तीनं विकत घेतला : अर्चना घारे-परब 

सावंतवाडी : पक्ष आणि चिन्ह गेलं तरी फरक पडत नाही. आमचा पक्ष 'शरद पवार' आहे‌. ज्यान स्थापना केली त्याच्याकडून पक्ष कसा हिरावला जाऊ शकतो ? हा प्रश्न आहे‌. येणाऱ्या काळात दगाबाजांना जनताच जागा दाखवून देईल अस विधान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केलं. तर हा निकाल अपेक्षित होता. कारण, निवडणूक आयोग अदृश्य शक्तीनं विकत घेतल्याचा आरोप कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केला. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, आम्हाला हा निकाल अपेक्षित होता. निवडणूक आयोग भाजपचे बटीक झाल्यानं हे अपेक्षित होत. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासोबत राहण्याच ठरवल होत. चिन्ह व पक्ष गेला तरी, आमच्या सोबत 'साहेब' आहेत. त्याचे विचार सोबत आहेत. नव चिन्ह, नवा पक्ष घेऊन आम्ही लोकांसमोर जावू. आम्ही कुणाला गद्दार म्हणायचा प्रश्न येत नाही. लोक त्यांना काय म्हणतात हे महत्वाचे आहे. विश्वासघात कुणी केलाय हे सर्वांना ठाऊक आहे. केवळ सत्तेत जाण्यासाठी भाजपला सोबत घेऊन कुणी घात केला हे सर्वांना ठाऊक आहे अस मत अमित सामंत यांनी व्यक्त केल. 


निवडूक आयोगान उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असाच निकाल दिला होता. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत दिला आहे. निवडणूक आयोग हा मोदी, शहांच्या इशाऱ्यावर चालत आहे. भाजपला जे हवय ते आयोग करत आहेत. मात्र, कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत हे ध्यानात ठेवावा असा इशारा माजी राज्यमंत्री प्रविण भोंसले यांनी दिला. आगामी काळात राज्यात महा विकास आघाडी व देशात इंडिया आघाडी दिसेल, हुकुमशाही नष्ट होईल असं ते म्हणाले.


तर हा निकाल वेदनादायी आहे. नाव आणि चिन्ह गेल तरी शरद पवार आमच्याकडे आहेत. त्यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. निवडणूक आयोग अदृश्य शक्तीन विकत घेतलेला आहे. शरद पवारांचा पक्ष त्यांच्याचकडुन कसा हिरावून घेतला हा प्रश्न आहे. पण, आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत. साहेब सोबत असल्यानं आम्ही कशालाही घाबरत नाही. आगामी काळात शरद पवार काय आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. मर्सिडीज गाडीच नाव आणि लोगो चोरला तरी गाडी तशीच आहे. तो दर्जा इतरांना येणार नाही असं विधान कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे, प्रसाद रेगे, भास्कर परब, पुंडलिक दळवी, देवा टेंमकर, सचिन पाटकर, हिदायतुल्ला खान, योगेश कुबल, सावली पाटकर, अॅड.सायली दुभाषी, सुधा सावंत, सुमित भाईप, श्रावणी कोरगावकर, संजय भाईप, सुहास कुडाळकर, सलीम नाबर, तैसीफ आगा, इलियास आगा, लालू पटेल, सागर पालकर, वैभव परब, अवधूत मराठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.