
सावंतवाडी : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजितदादा पवार गटाला निर्णय दिला.त्याबद्दल सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश चिटणीस सुरेश गवस, तालुकाध्यक्ष उदय भोसले, महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब, महिला शहाराध्यक्षा सौ. रंजना निर्मळ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, प्रांतिक सदस्य सत्यजित धारणकर, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शाफिक खान, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, अजगाव येथून यशवंत जाधव, आशिष कदम, व्ही. जे. एन. टी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या बाजूने निकाल लागला आहे. अजितदादा पवार यांच्याकडे पक्षाची मोठी आमदारांची, खासदारांची संख्या आहे. राज्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी पाठीशी आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश चिटणीस म्हणून मी स्वागत करतो.