
कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी कुडाळ येथे मानाचा नारळ अर्पण केला जातो. याही वर्षी हा नारळ युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत कुडाळ - मालवण मतदार संघाचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप राणे, चेतन पोवार, दीपराज रावळ, योगेश हेरेकर राज दळवी, प्रथमेश बाणे, प्रज्वल नाईक, प्रकाश राजपूत, हेमंत घाडी आदी उपस्थित होते.