
सावंतवाडी : माजी नगरसेवक उमाकांत सदाशिव वारंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी ही निवड केली असून पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाच्या विविध ध्येय-धोरणाच्या अंमलबजावणीसाठी श्री. वारंग यांना सूचित केले आहे.
उमाकांत वारंग हे सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक असून सातत्याने सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबवित असतात. विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात त्यांचा सातत्याने सहभाग असतो. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.