
दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग दिव्यांग सेल अध्यक्ष पदी साबाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीय.
दोडामार्ग तालुक्यातीळ साई श्रद्धा दिव्यांग निराधार, गरजू, संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत हे दिव्यांग व निराधारांच्या बाबतीत करत असलेल्या कामाची दखल घेवून मुंबई येथे राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षांच्या प्रवेश कार्यालयात, अपक्षांचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी महारष्ट्र राज्य प्रमुख दिव्यांग सेलच्या राज्य प्रमुख नीताताई ढवण, सुरेश गवस, सा प्रदेश सचिव, जिल्हा अध्यक्ष अबीद नाईक, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रदेश सचिव मा. एम. के गांवडे व दोडामार्ग तालुका सचिव मा. दिपक देसाई, इतर मान्यवर उपस्थित होते.