घारेंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी 'सिल्व्हर ओक'वर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 19, 2024 10:53 AM
views 2028  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. माजी आमदार राजन तेली यांच्या उबाठा शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

राजन तेली यांनी भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सिल्व्हर ओक गाठले. शरद पवार यांची त्यांनी भेट घेत चर्चा केली. या भेटीत नेमकं काय घडलं ? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, तेलींच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला अध्यक्षा अँड. रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.