
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठरवलेल्या राज्यात सभासद नोंदणी करण्याच्या धोरणानुसार मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका कार्यालय येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी जिल्हा कार्यकारिणी सभा घेऊन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन हजार सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याचबरोबर दर महिन्याला प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी सभा घेण्यासाठी तारखांनिश्चित करण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष अबिद नाईक मार्गदर्शन करताना प्रत्येक तालुकाध्यक्ष यांनी गावागावात जाऊन सभासद नोंदणी करण्याच्या सूचना केली. त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर यांनी संघटना वाढीसाठी सर्वांनी आपल योगदान देणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रदेश चिटणीस एम. के. गावडे यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी सांघिक काम करा असे सांगितले. प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी पक्षाच्या कामात कुठल्याही पदाधिकारी यांनी प्रामाणिक काम करा असा संदेश दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस एम के गावडे, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव मनोहर साटम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर, देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, जिल्हा सचिव विलास पावसकर, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, रोहन परब, दोडामार्ग महिला तालुकाध्यक्ष सौ. मानसी देसाई, दीपक देसाई, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, कणकवली युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, कुडाळ तालुका उपाध्यक्ष विराज बांदेकर, तालुका उपाध्यक्ष मेघेंन देसाई, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत आदी उपस्थित होते.