शफिक खान यांची अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव पदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत, सिराज मेहेंदी यांच्या हस्ते शफिक खान यांना देण्यात आले पद
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 26, 2022 16:26 PM
views 281  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहेंदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान यांना अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव पद देण्यात आले. या वेळी प्रदेश निरिक्षक नसिम सिंद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष सुल्तान मालदार, प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.