
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे. सावंतवाडी, वेंगुर्लेसह दोडामार्गात देखील राष्ट्रवादीनं सदस्य निवडून आणलेत.
अर्चना घारेंच्या रूपाने राष्ट्रवादीने तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एन्ट्री केली असून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या तिरोडा गावात सरपंचासह संपुर्ण पॅंनल महाविकास आघाडीचे निवडून आणले आहे. सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका सावंत या ठिकाणाहून निवडून आल्या आहेत. तर कोनशी दाभिलमध्ये 7 पैकी 4 सदस्य, माडखोल संजय देसाई दिव्यांग सदस्य विजयी झालेत. दिव्यांगास उमेदवारी देत बरबटलेल्या राजकारणात राष्ट्रवादीन नवा आदर्श राजकारणात घालून दिला आहे. चराठा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंगत आणून गौरी गावडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी ग्रामपंचायतीत एन्ट्री घेऊन सावंतवाडी नगरपरिषदेच्या दारा पर्यंत पोचली आहे. दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यात वजराठ गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सौ. पुराणीक व महाविकास आघाडीच पॅंनल विराजमान झाल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विलवडे, आडेली, अंबाडगाव, कुणकेरी, पारपोली, नेतरडे, कोलझर, कुंबरल, घाटगे ईत्यादी अनेक गावात अनेक सदस्य विजयी झाले आहेत.
तर अर्चना घारे-परब यांच्या गावात गाव विकास पॅंनलला राष्ट्रवादीनं आपला पाठिंबा दिला होता. या ठिकाणी गाव विकास पॅंनलचे समिर परब सरपंच पदी विराजमान झाले आहेत. त्यांचा देखिल सत्कार करण्यात आला.