चराठ्यात राष्ट्रवादीनं लावली फिल्डिंग !

मारीती बावतीस फर्नांडिस यांचा डोअर टू डोअर'प्रचार | तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींनी ठोकला तळ !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 13, 2022 15:58 PM
views 288  views

सावंतवाडी : चराठे गावात सरपंच पदासाठी ५ महीला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन देखील या निवडणुक रिंगणात मारीता बावतीस फर्नांडिस यांना उतरवत जोरदार फिल्डींग लावली आहे. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी मागचे २ दिवस फर्नांडिस यांच्या प्रचारासाठी चराठ्यात तळ ठोकला होता. डोअर टू डोअर प्रचारावर सौ. फर्नांडिस यांनी भर दिला असून माझासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी पुरस्कृत 'श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅनल'च्या  प्रभाग क्र. १ चे उमेदवार सुनिल राजाराम परब, मंजिरी मिलींद उपरकर,प्रभाग क्र. ३ चे उमेदवार मिलींद अंकुश उपरकर, गौरी सागर गावडे बहुमताने विजयी होतील असा विश्वास मारीता बावतीस फर्नांडिस यांनी व्यक्त केला आहे.


मागच्या सत्ताधारी लोकांनी जनतेला काही दिलं नाही, विकास केला नाही अशी व्यथा ग्रामस्थ आमच्यासमोर मांडत आहेत. विकासाच स्वप्न अन् परिवर्तनाचा ध्यास घेवून आम्ही निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहोत. त्यामुळे नक्कीच, गावचा विकास करण्यासाठी माझे चराठावासिय माझी पत्नी मारीतासह आमच्या राष्ट्रवादीच्या श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅंनलच्या चारही उमेदवारांना संधी देतील असा विश्वास आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी बावतीस फर्नांडिस यांनी व्यक्त केला. 


दरम्यान, प्रभाग क्रमांक ३ च्या उमेदवार गौरी सागर गावडे म्हणाल्या मी, राष्ट्रवादी पुरस्कृत श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅंनलची अधिकृत उमेदवार आहे. परंतु, विरोधी पॅनलन आपल्या प्रचार पत्रकात माझं नाव छापल्याच निदर्शनास आले आहे. त्याचाशी माझा कोणताही संबंध नसून  श्री देवी सातेरी विकास परिवर्तन पॅंनलची मी अधिकृत उमेदवार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील मारीता फर्नांडिस यांच्या प्रचारात सहभाग घेत त्यांच्यामागे ताकद उभी केली आहे. पंचरंगी होणारी ही निवडणूक आमच्या पॅंनलच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडणार असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. संपूर्ण चराठा गावात डोअर टू डोअर प्रचारावर सौ. फर्नांडिस यांनी भर दिला असून त्यांच्यासोबत बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू, फ्रान्सिस डिसोझा, क्लिंटन फर्नांडिस, फ्रॅंकलीन फर्नांडिस आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चराठा गाव पिंजून काढला आहे.