राष्ट्रवादी कोणाची ? ; निवडणूक आयोगात सुनावणी

Edited by: ब्युरो
Published on: November 20, 2023 15:43 PM
views 270  views

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कोणाची? पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी चार वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार आहे. विशेष, म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यासंदर्भात निर्णय देणार आहे. दरम्यान, या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली होती. आता पुन्हा आजपासून सुनावणी सुरु होणार आहे. तसेच, दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत रणनिती ठरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगापुढे २ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. त्यात अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप त्यांनी युक्तीवाद करताना केला. मृत्यू झालेल्या लोकांची प्रतिज्ञापत्रे दिली गेली. तसेच, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला होता.