राष्ट्रवादीने रिक्षाचालकांसोबत रक्षा बंधन केलं साजरं...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 31, 2023 16:16 PM
views 158  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने सावंतवाडीमधील गांधी चौक येथे रिक्षाचालक बांधवांसोबत रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यात आला. बहिणीने भावाला राखी बांधावी व भावाने बहिणीला आजन्म रक्षणाचे वचन द्यावे हा या सणाचा मतितार्थ असून संपूर्ण सावंतवाडी मधील रिक्षाचालक बांधव हे भावाप्रमाणे सर्व महिलांना सुरक्षित प्रवास घडवतात. सावंतवाडी शहरामध्ये रात्री बेरात्री प्रवास करताना रिक्षाचालक बांधवांमुळे नेहमीच सुरक्षेची भावना मनात असते. आजपर्यंत या बांधवांबाबत गैर वर्तनाची एकाही घटना ऐकिवात नाही.  त्यांच्या प्रामाणिकपणाच्या मात्र अनेक घटना आहेत. रिक्षा चालक बांधवांच्या या सेवेबद्दल त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आगळावेगळा सोहळा राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. 

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः रिक्षाचालक होते. आज रक्षाबंधनानिमित्त मी त्यांची बहीण म्हणून राज्यातील रिक्षाचालक बांधवांना विमा संरक्षण, कल्याणकारी मंडळ, स्वस्त इंधन आदी सुविधा उपलब्ध करून दयाव्यात ही मागणी करते. भाऊ म्हणून ते आमची मागणी पूर्ण करतील हा विश्वास आम्हाला आहे अशी भावना अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केली.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ॲड रेवती राणे, सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, पुजा दळवी, वैशाली पै, जिजा कांबळे, सिद्धी निंबाळकर,  रूक्साना खान, दिव्या कडव, स्वरा धोंड, सुधा सावंत, अंकिता सरदेसाई, प्राजक्ता सावंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.