राष्ट्रवादीची उपजिल्हा रुग्णालयाला धडक

वैद्यकीय अधिक्षकांचं वेधलं तक्रारींकडे लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: September 08, 2023 12:53 PM
views 293  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेत रूग्णालयातील असुविधांसह कर्मचारी वर्गान केलेल्या तक्रारीबद्दल लक्ष वेधले. यावेळी प्रदेश सचिव सुरेश गवस, प्रदेश प्रतिनिधी उदय भोसले, अशोक पवार, गुरूदत्त कामत, राजू धारपवार, अस्लम खतीब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.