राष्ट्रवादीचा स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागर : अॅड. उमेश सावंत

स्वराज्य सप्ताह मेळाव्यनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2024 13:38 PM
views 148  views

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताह निमित्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा या टॅगलाईन खाली आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागरच  म्हणावे लागेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश विधिज्ञ उमेश सावंत यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित स्वराज्य सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अॅड. उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथील एच पि सी एल सभागृहात करण्यात आले. त्यावेळी अॅड. उमेश सावंत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश सचिव सुरेश गवस,प्रदेश सचिव एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, व्ही.जे.एन. टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, प्राध्यापक हरिभाऊ भिसे, प्रसाद राणे, हूमेरा नाईक, रिजा नाईक राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, प्रांतिक सदस्य, विलास गावकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडूलकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, जिल्हा प्रतिनिधी सचिन अडुळकर, दिपेश सावंत, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, वैभववाङी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सत्यवान गवस, कुडाळ तालुका अध्यक्ष आर.के.सावंत, देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत,सत्यजित धारणकर, रोहन परब, सावंतवाङी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब,रिया भांबूरे, कणकवली महिला तालुका अध्यक्ष स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे, सुधाकर कार्ले, सुधाकर ढेकणे, राजेंद्र पिसे भाई डांबे, बाबू परब, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, वेंगुर्ला शहर अध्यक्ष सूरज परब, बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ऍड. उमेश सावंत म्हणाले की , 19 फेब्रुवारी रोजी 396 वर्षे शिवजन्माला होत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य ही शिवरायांची भावना उद्धृत केली आहे. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी अगदी पक्षाच्या उतरत्या काळात सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षसेवा केली. मोजक्या शिलेदारांच्या पाठबळावर अबिद नाईक यांनी पक्ष वाढवला. 8 महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यात संघटनेची पुनर्बांधणी करून पक्ष अस्तित्व दाखवून दिले.शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले होते. म्हणूनच छत्रपतींची जयंती राज्यात अजूनही घराघरात साजरी केली जात आहे. 

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले की,   पक्ष धोरणानुसार राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार स्वराज्य सप्ताह निमित्त जिल्ह्याभरात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा शिवचरित्रावर आधारित घेण्यात आल्या. 600 हुन अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून बालमनावर शिवसंस्कार बिंबवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले आहे.या स्पर्धेनिमित्ताने राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आणि पदाधिकारीसुद्धा जनतेच्या घराघरात आणि मनामनात पोचला. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सांघिक प्रयत्नाने स्वराज्य सप्ताह यशस्वीपणे साजरा झाला आहे. 

जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर  म्हणाले की,  छत्रपती शिवरायांचे कार्य आजच्या पिढीला माहीत असणे अत्यावश्यक आहे. शिवरायांनी शेतकरी हित, महिला सन्मान सांभाळत, सामाजिक हित जोपासले. हेच समाजभान राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राखून स्वराज्य सप्ताह राज्यभरात साजरा केला आहे. एम के गावडे, प्रज्ञा परब, सुरेश गावकर, प्रा. भिसे, मुख्याध्यापक कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रिया सावंत, रसिका कदम, वृषाली जाधव यांनी केले. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण प्रसाद राणे, श्री. गावकर यांनी केले. बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन विकास गावकर यांनी केले.