सावंतवाडीतील राष्ट्रवादीच्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 09:53 AM
views 154  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वराज्य सप्ताह या कार्यक्रमांतर्गत सावंतवाडी भटवाडी येथील वि. स. खांडेकर शाळेमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच जनसामान्यांपर्यंत स्वराज्य संकल्पना पोचावी हा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ. रिद्धी परब, शहाराध्यक्षा सौ. रंजना निर्मळ, प्रांतिक सदस्य सत्यजित धारणकर, जिल्हा सचिव गुरुदत्त कामत, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली चित्रकला आणि निबंध स्पर्धा ही विद्यार्थ्यांना छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी व त्यानिमित्ताने जनसामान्यांपर्यंत स्वराज्य संकल्पना पोहोचावी हा उद्देश आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी केले.