
दोडामार्ग : सावंतवाडी विधानसभा मतदार संघात तरुण युवकांची फळी निर्माण करण्यासाठी तरूण तडफदार पदाधिकारी रविकिरण गवस यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे मतदार संघात नवे चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या आदेशानुसार नियुक्ती पञ रविकिरण यांना देण्यात आले. दोडामार्ग येथील सुरेश भाई दळवी यांच्या कार्यालयात हे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी लोकनेते सुरेश भाई दळवी, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, दीपिका राणे, देवेंद्र टेबंकर, दीपिका राणे, सायली पांगम, ममता नाईक, प्रिया देसाई, प्रदीप चंदेलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रविकिरण गवस हा तरुण युवक गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मध्ये चांगले काम करत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार यांच्या प्रचारासाठी काम केले होते. शिवाय मतदार संघातील सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, तालुक्यातील मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग रविकिरण गवस यांच्या सोबत आहे. शिवाय काम करण्याची पद्धत चांगली आहे.
रविकिरण गवस यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच खासदार, सुप्रिया सुळे, लोकनेते सुरेशभाई दळवी, जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी रविकिरण गवस यांच्यावर सोपवली आहे.
दोडामार्ग येथे आयोजित मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, सुरेशभाई दळवी यांच्या हस्ते हे नियुक्ती पञ रविकिरण गवस याना देण्यात आले. यावेळी रविकिरण गवस यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पक्ष वाढला पाहिजे तसेच बेकार युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी येथे उद्योग व्यवसाय सुरू झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मतदार संघातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असे रविकिरण गवस यांनी सांगितले.