
मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना ही देशात प्रथमच घडली आहे. पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले आहे सरकारने आता राजकोट येथे शिवरायांचे असे स्मारक उभारावे जे देशासाठी विलोभनीय असेल, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवप्रेमी म्हणून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी राष्ट्रवादी तर्फे काळ्या फिती लावून शिवपुतळा दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मालवण मधील राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजकोट येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम.के. गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डि.सावंत, राष्ट्रवादी व्ही. जे. एन. टी.जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस,कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्षण पावसकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर,जिल्हा सचिव सतीश पाताडे, जिल्हा सचिव सुशील चमणकर ,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, कणकवली राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालणकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण ,सौ. ऋतुजा शेटकर, व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष आशिष कदम, वैभव वाडी तालुकाध्यक्ष वैभव राव राणे, देवगड जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, जिल्हा सचिव केदार खोत, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संतोष राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी अबीद नाईक म्हणाले, शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातही हे आंदोलन करण्यात आले. राजकोट येथील शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच युगपुरुषांच्या बाबतीत भविष्यात पुन्हा अशी घटना घडता नये, याची खबरदारी प्रशासनाने व सरकारने घेतली पाहिजे. आम्ही घटक पक्ष म्हणून सरकार मध्ये आहोत, देशाला विलोभनीय ठरेलं असे छत्रपतींचे स्मारक सरकारने उभारावे, याद्वारे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान वाढविण्यासाठी राष्ट्रवादीचे आर्थिक व इतर जे आवश्यक सहकार्य असेल ते लाभेल, असेही अबीद नाईक म्हणाले.