
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत एनसीसी विभागामार्फत सन २०२५ - २६ वर्षातील एनसीसी विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नविन वर्षाचा प्रारंभ करणाऱ्या नवागत एनसीसी कॅडेडचे स्वागत करण्यात आले दुसऱ्या वर्षांच्या एनसीसी कॅडेडकडे नविन वर्षात पदार्पण केलेल्या विद्यार्थांना शिस्त आणि देशाभिमान यांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली तसेच एनसीसी विभागात तीन वर्षे उकृष्ट कामगिरी करून एनसीसी प्रमाणपत्र प्राप्त करून यशस्वी झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या स्नेहवर्धक कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर . यांनी प्रशालेतील एनसीसी विभागाचा प्रारंभ आणि विकास या विषयी मार्गदर्शन केले शिस्त ' स्वावलंबन ' देशाभिमान , आणि व्यक्तिमत्व या गुणांचा विकास एनसीसी मध्येच होत असतो ज्या शाळेत राष्ट्रीय छात्र सेना असते त्या शाळेंची शिस्त नेहमी वाखानण्यासारखी असतेच . असे मत कांबळे सरांनी मांडले . पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी एनसीसी आणि करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या
एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन श्री अमोल शेळके सरांनी वर्षभरात विभागामार्फत घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन नविन विद्यार्थांच कौतुक केले एनसीसी कॅप्टन सौ शर्मिला केळुसकर यांनी प्रास्ताविक करून एनसीसीचे विद्यार्थी जीवनातील महत्व विषद केले तृतीय वर्षाच्या विद्यार्थांनी आपले अनुभव कथन करून नविन निद्यार्थांना शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाला एनसीसी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते