
सावंतवाडी : 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे महाकनेक्ट २०२४ रॅली अंतर्गत नौदल टीमचे जंगी स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या चेअरमन सौ शुभदादेवी भोंसले, संस्थेचे संचालक अँड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. एल.भारमल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे केले.
यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये 13 नौदल अधिकारी एकूण 150 एनसीसी कॅडेट्स आणि 3 एनसीसी ऑफिसर्स उपस्थित होते. कमांडर अंकीश बुंदेला, कमांडर सौजन्या आणि कमांडर असिफ मुल्ला यांनी सर्व कॅडेट्सना प्रेरित केले. लेफ्टनंट कमांडर सूक्ष्म पंगोत्रा,लेफ्टनंट अच्युत कुमार आणि लेफ्टनंट कमांडर गौरव सिंग यांनी सेवेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. भारतीय नौदल हे शाळा तांत्रिक महाविद्यालय आणि नागरी लोकसंख्येच्या विद्यार्थ्यांशी संलग्न होण्यासाठी भारतीय नौदलाच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवते. महाराष्ट्राच्या उत्तरे मध्ये दक्षिण भागातील किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह आणि अंतराळात पोहोचण्यासाठी सोनक टोयोटा इंडियन लिमिटेड च्या संयुक्त विद्यमाने ८ जुलैपासून २५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ३२ जिल्ह्यांचा महा कनेक्ट कार ड्राईव्ह समावेश आहे. शहरे आणि तीन रेडियल सहज सुमारे ४२१० किलोमीटर संचय अंतर प्रवास करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय नौदल सेनेच्या गौरव शाली इतिहास व कार्याबद्दल परिचित करण्यात आले. याबरोबरच या अभियानाद्वारे एनसीसी कॅडेट्सना नौदल सेवेत कोणकोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन महा कनेक्ट टीमने केले.
तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल.भारमल यांनी नौदलाच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचे RIS मेहबूब, सुभेदार नेगी , सीएचएम महेश व हवालदार राकेश बनसोडे त्याचबरोबर सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी श्री.गिरप याप्रसंगी उपस्थित होते. एनसीसी विभाग महाविद्यालयात सदैव चांगले कार्य करत असते. यापुढेही असेच एनसीसी विभागाद्वारे चांगले सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करून एनसीसी विद्यार्थ्यांनीही या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी एनसीसीचे आर्मीचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.सचिन देशमुख, नेव्हीचे असोसिएट एनसीसी ऑफिसर सब लेफ्टनंट डॉ. विशाल अपराध, एनसीसी आर्मी मुलींच्या केअर टेकर ऑफिसर सौ. कविता तळेकर यासोबत मदर क्वीन हायस्कूलचे 100 विद्यार्थी, राणी पार्वती देवी हायस्कूलचे एनसीसीचे विद्यार्थी, कळसुलकर हायस्कूलचे एनसीसी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.