मालवणात असा साजरा होणार नौसेना दिवस | जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Edited by:
Published on: December 02, 2023 20:59 PM
views 897  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथे दिनांक ०४ डिसेंबर रोजी राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे अनावरण तसेच भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रतंप्रधान, भारत सरकार व इतर मंत्री तसेच  महनीय व इतर अतिमहनीय व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, दिनांक ०४ डिसेंबर २०२३ रोजी होणा-या नौदल दिन कार्यक्रमाचे प्रात्याक्षिके ४.०० वाजलेपासून सुरु होणार असून दुपारी १.०० वाजेपर्यंत प्रवेश सुरु राहणार आहे. नागरिकांना कार्यक्रम बघण्याची व्यवस्था तारकर्ली व्यासपिठाच्या दक्षिणकडे तारकलीं बीच देवबागकडे आणि उत्तरेकडे दांडी बीच कडे केली आहे. नागरिकांना वाहन पाकींगकरीता दांडी बीच ते मो-याचा धोंडा, काळेथर मैदान व ग्रामपंचायत तारकर्लीच्या बाजूला सोय करण्यात आलेली आहे. कार्यक्रम सर्वांना पाहता यावा यासाठी कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते, नौदल दिन कार्यक्रम व नौसेना विभागाचे प्रात्याक्षिके पाहण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच तारकर्ली मालवण येथे समुद्रकिनारी नौदल दिवस साजरा होणार आहे. नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहताना मोठ्या बॅगा, मोठया पर्स, लहान मुले व वृध्द व्यक्ती सोबत आण नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.