
सावंतवाडी : मनुष्य वस्तीमध्ये वन्यप्राणी वापराबाबत आलेल्या तक्रारींनंतर वन विभागाकडून रेस्क्यू टीम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मनुष्य वस्तीत येणाऱ्या वन्यजीवांना जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडल जात आहे अशी माहिती उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी दिली. तसेच शहरातील पट्टेरी वाघाच्या व्हायरल फोटोबाबत विचारलं असता अद्याप वाघाला बघितलेली व्यक्ती समोर आलेली नाही. बिबट्यांचा वावर या भागात असून त्यासाठी वन विभागाची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे असं रेड्डी म्हणाले.
उपवनसंरक्षक श्री.रेड्डी म्हणाले, वन्य प्राणी वावराबाबत तक्रारी असल्याने स्वातंत्र्य दिनापासून त्यासाठी तीन रेस्क्यू टीम तयार केल्या आहेत. दोन टीम वन माकडांसाठी कार्यरत आहेत. त्यांना जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडल जात आहे. रेसक्यू कीट त्यांना दिलं आहे. मानवी वस्तीत वन्य प्राणी आल्यास होणारा संघर्ष टाळण्यासाठी या टीम कार्यरत आहेत. शहर, गाववस्तीतून आलेल्या तक्रारींनंतर टीमकडून सर्वेक्षण होत. त्यांना रेसक्यूही केलं जातं. लोकांमध्ये जागृती देखील केली जाते. हा संघर्ष कमी व्हावा यासाठी प्रशिक्षणही दिलं जातं. वन्य प्राणी आल्यास आम्हाला संपर्क साधण्याच आवाहन देखील केलं आहे. जिल्ह्यातील घटना बघता त्यासाठी हेल्प लाईन नंबर देखील देण्यात आला आहे. आमच्या माध्यमातून मानवी सुरक्षितेतीसाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील अशी माहिती उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी दिली. तसेच शहरातील व्हायरल पट्टेरी वाघाबाबत विचारलं असता ते म्हणाले, असा कोणताही प्रकार आमच्यापर्यंत आलेला नाही. हा वाघ कोणाला दिसला अस कोणी सांगितलेल नाही. किंवा कोणी फोटो टीपला हे देखील माहित नाही. सोशल मीडियावर तो दिसत आहे. मात्र, बिबट्याचा वावर आपल्या भागात आहे. त्यादृष्टीने वन विभागाची टीमही कार्यरत आहे. आजही जेथून तक्रारी येत आहे त्या भागात टीम पोहचली आहे. वन आणि मनुष्य संघर्ष होऊ नये यासाठी कार्यरत आहे असं उप वनसंरक्षक श्री. रेड्डी म्हणाले.