
कुडाळ : ग्रामपंचायत वेताळ बांबार्डे आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिलांसाठी नऊवारी साडी शिवणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज सरपंच सौ. वेदीका दळवी यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे, सदस्य साजूराम नाईक, दशरथ कदम, समृद्धी कदम, रश्मी तिवरेकर, सृष्टी सावंत, संस्था समन्वयक समीर शिर्के, प्रशिक्षक रेश्मा नेमळेकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपसरपंच प्रदीप गावडे यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले व प्रशिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सरपंच वेदीका दळवी यांनी प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले. शिवणकाम करणार्या महिलांसाठी नऊवारी साडी शिवायचे कौशल्य प्राप्त झाल्यास त्याचा उपयोग व्यवसायासाठी निश्चित होणार त्यामुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गावातील 30 महिलांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण संस्थेचे तालुका समन्वयक श्री. समीर शिर्के यांनी केले.