वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे निसर्गाच्या सान्निध्यात योग शिबिर

Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2023 17:05 PM
views 80  views

 वेंगुर्ले : नगरपरिषदेमार्फत या वर्षी ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन जलबांदेश्वर येथे निसर्गरम्य ठिकाणी समुद्राच्या सानिध्यात साजरा करण्यात आला. डाॅ.वसुधा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके केली गेली. या शिबिरात न.प अधिकारी, कर्मचाऱी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या या योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.


दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगा सरावाच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि जगभरातील लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच शारीरिक आणि मानसिक निरोगीपणाचे महत्त्व आणि ते संतुलन साधण्यासाठी योगाची भूमिका अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२३ ची थीम ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ अशी होती.

दरम्यान या शिबिरामध्ये माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडकर तसेच बाबली वांगणकर, सुनील रेडकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.