आंबोलीत निसर्ग पर्यटन गाईड शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 11, 2025 11:16 AM
views 179  views

सावंतवाडी : आंबोली येथे 12 व 13 जून रोजी निसर्ग पर्यटन गाईड शिबीर वनक्षेत्रपाल कार्यालय आंबोलीच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी दिली.

निसर्ग पर्यटन गाईड शिबीर आंबोलीमध्ये आयोजित करण्यात आल आहे. आंबोली वनपरिक्षेत्रातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. वन क्षेत्रपाल आंबोली सौ प्र. सु. शिंदे च्या सूचनेनुसार आंबोलीतील वनविश्राम गृह, फ़ॉरेस्ट गार्डन येथे निसर्ग पर्यटन गाईड शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंबोली परिक्षेत्र मध्ये आढळणारे फुलपाखरू बाबत हेमंत ओगले, उभयचर व सरीसुपबाबत महादेव भिसे,पक्षी बाबत भाग्यश्री परब,वनस्पती बाबत राजेश देऊळकर मार्गदर्शन करणार आहेत. निसर्ग पर्यटन गाईड शिबीराच्या माध्यमातून जे प्रशिक्षण घेणार त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देणार आहे. निसर्ग पर्यटन गाईड शिबीराच्या माध्यमातून नवीन रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. हे प्रशिक्षण 12 व 13 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. आंबोलीमध्ये फार मोठया प्रमाणात निसर्ग प्रेमी भेट देत असतात व त्यातुनच एक रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होत आहे. त्याचा फायदा येथील युवकांना व्हावा यासाठी शिबीर महत्वाचे ठरणार आहे. या वन परीक्षेत्र आंबोली च्या अत्यारितील युवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केले आहे.