मालवण तहसीलमध्ये नैसर्गिक आपत्‍ती प्रशिक्षण

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 13, 2023 16:33 PM
views 71  views

मालवण : जागतिक आपत्‍ती धोके निवारण दिनानिमित्त महसूल प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्‍ती प्रशिक्षण घेण्यात आले. नैसर्गिक आपत्‍तीचे प्रकार, आगीचे प्रकार तसेच अचानक लागलेल्‍या आग वरती कोणत्‍या प्रकारचे फायर इक्‍सींगशन वापरावे व आग आटोक्‍यात आणावी याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. 

मालवण तहसिलदार कार्यालय येथे तहसिलदार श्रीम. वर्षा झालटे यांचे अध्‍यक्षतेखाली तसेच सागरी पीआय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली  जागतिक आपत्‍ती धोके निवारण दिन आज साजरा करण्‍यात आला. या प्रशिक्षणात पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्‍हे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, निवडणुक नायब तहसलिदार नागेश शिंदे, महसूल सहायक उमेश काळे तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व महसूल कर्मचारी  उपस्थित होते. सदर नैसर्गिक आपत्‍ती प्रशिक्षणात नैसर्गिक आपत्‍तीचे प्रकार तसेच आगीचे प्रकार तसेच अचानक लागलेल्‍या आग वरती कोणत्‍या प्रकारचे फायर इक्‍सींगशन वापरावे व आग आटोक्‍यात आणावी याबाबत सागरी पीआय श्री. सिंग यांनी मार्गदर्शन केले.