
कणकवली : कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ येथे राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने अध्यक्ष आनंद पारकर यांनी अबिद नाईक यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
अबिद नाईक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना अबिद नाईक यांच्या कन्या इक्रा नाईक, रिजा नाईक, वागदे सरपंच संदीप सावंत, मंडळाचे अध्यक्ष आनंद पारकर खजिनदार अनंत पारकर, उपाध्यक्ष कल्याण पारकर, संजय ठाकुर, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, राष्ट्रवादी माजी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, आदि उपस्थित होते.