किर्लोस इथं शिवाजी कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबीर !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 08, 2024 07:30 AM
views 104  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, किर्लोस संचलित, डाँ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना  शिबीर दिनांक 6 ते 07 फेब्रुवारी कालावधीत शिवाजी मंदीर ट्रस्ट, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे प्रा. गोपाल गायकी कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. 

सदर शिबीरामध्ये कृषी महाविद्यालयाच्या तृतिय वर्षाच्या एकूण 60 विदार्थ्यानी सहभाग घेतला होता. शिबीरामध्ये स्वच्छता मोहिम, बागकाम, नैसर्गिक निविष्ठा सादरीकरण, बंधारे बांधणे इत्यादी कामे करण्यात आली.  

याव्यतीरिक्त सकाळी प्रार्थना, योगा, चहा,  नाष्ठा, श्रमदान, चर्चासत्र, खेळ, मनोरंजन, मार्गदर्शन, कामाचा आढावा, सुप्त गुणांना वाव,  राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रगीताने दिवसाची सांगता अशा प्रकारचे दैनंदिन वेळापत्रक होते. 

या शिबीरास डॉ. प्रभुदेसाई, जिजामाता हॉस्पिटल , श्री. घोंगे साहेब, तालुका कृषी अधिकारी व सौ. राऊत मॅडम, मंडळ कृषी अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून लाभले. तसेच  मार्गदर्शक म्हणून श्री. बाळकृष्ण गावडे, वरिष्ठ  शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग व डाँ. विलास सावंत, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, प्रा. योगेश पेडणेकर, प्राचार्य, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस, प्रा. गोपाल गायकी, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. प्रसाद आगेले, प्राद्यापक, प्रा. महेश परूळेकर, प्राध्यापक  प्रा. सुभाष बांबुळकर, प्राध्यापक श्री. सुनिल जाधव व श्री. प्रकाश किर्लोस्कर इत्यादीचे मोलाचे मार्गदर्शन विधार्थ्याना मिळाले, त्याचबरोबर आलोक दळी, वासुदेव रावुळ, सौरभ टेंगले, हर्षवर्धन भोसले, अजित धायगुडे, स्नेहा इंगुळकर, वैष्णवी सरखोत, प्रचिती भगत, दक्षता नेहा शेलार या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.