
सावंतवाडी : सोशल युनिटी फाउंडेशन, देहरादून आयोजित राष्ट्रस्तरीय वेशभूषा स्पर्धेत, जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग मध्ये इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राष्ट्रातून लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. हिंदी ,इंग्रजी, मराठी ,गुजराती अशा विविध भाषातून हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये मराठी भाषेतून तानाजीची वेशभूषा साकारणाऱ्या नील नितीन बांदेकरने राष्ट्रात प्रथम येऊन कोकणचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. यासाठी त्याला मार्गदर्शक म्हणून त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशासाठी विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.