
कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे मध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या फोटो पुजनाने झाली.
शाळेचे उपमुख्याध्यापक ओंकार गाडगीळ यांनी फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा सादर करण्यात आला. यानंतर इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीं शिवरायांची आरती सादर केली.विद्यार्थी प्रतिनिधी अर्णव राणे याने आपले विचार व्यक्त केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी शिवरायांची किर्ती सांगणारे गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता शाळेचे उपमुख्याध्यापक ओंकार गाडगीळ यांच्या भाषणाने झाली. या संपुर्ण कार्यक्रमाला संगीताची साथ शाळेचे संगीत शिक्षक हेमंत तेली आणि सचिन पडवळ काका यांची लाभली. संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.